ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यादांचा विचार करून अणुऊर्जा निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या बजेटमधून मांडला गेला आहे. अणुऊर्जेसाठी करण्यात आलेली तीन हजार कोटींची तरतूद त्याचे प्रत्यंतर देते. महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा निर्मितीला केंद्र सरकारने दिलेले प्राधान्य विशेष आहे. भविष्यात देशाला अणुऊर्जेवर अधिक निर्भर राहावे लागणार, याची खूणगाठ बांधून त्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल मानले जात आहे. अणुऊर्जेच्या बाबतीत भारताच्या स्वयंपूर्णतेचाही त्यातून पुरेपूर वापर होणे अभिप्रेत आहे.