नवी दिल्ली : मोटार अपघाताची नुकसानभरपाई दावा केलेल्या रकमेहून अधिक दिली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दावेदारांनी कमी रकमेची मागणी केली असली किंवा दावा याचिकेत नुकसानीचे मूल्यांकन कमी केलेले असले तरी भरपाईच्या बाबतीत प्रत्यक्षात योग्य व देय रक्कम दिली गेली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.
या प्रकरणात मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ६ टक्के व्याजदराने ४ लाख ९९ हजार रुपये भरपाई दिली होती. उच्च न्यायालयातील अपिलात भरपाईची रक्कम वाढवून १७ लाख ८३ हजार ६०० रुपये करण्यात आली. अपिलात करण्यात आलेले नुकसानीचे मूल्यांकन केवळ ६ लाख ५० हजार रुपये होते. असे असताना उच्च न्यायालयाने वाढीव नुकसानभरपाई मंजूर केली.
योग्य भरपाई दिली जावी : न्यायालयन्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की, भरपाईबाबत प्रत्यक्षात योग्य आणि देय रक्कम दिली जावी. मग भलेही दावेदाराने कमी रक्कम मागितली असेल किंवा दावा याचिकेच मूल्यांकन कमी मूल्यावर केले गेलेले असेल.