हरिश गुप्तानवी दिल्ली : रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना असलेले मोटारवाहनविषयक वटहुकूम काढण्याची वेळ भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितन गडकरी यांच्यावर आली आहे. हे विधेयक दोन वर्षापूर्वी लोकसभेत मंजूर झाले पण गदारोळामुळे राज्यसभेत मंजूर झाले नाही.या विधेयकाला संसदेच्या निवड समितीने संमती दिल्यानंतर त्याला राज्यसभेतील विरोधकांनी संमती देण्याची तयारी दर्शवली. मात्र गदारोळात ते अडकले.त्यामुळे या सुधारित विधेयकाचा वटहुकूम काढण्याचा मार्ग नितीन गडकरींना चोखाळावा लागला. या विधेयकाची फाइल पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांनी या प्रक्रियेच्या मंजूरीसाठी पाठवली.८०० रुग्णवाहिकांची सोयअपघात टाळण्यासाठी वाहन चालविण्याचे उत्तम प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी देशाच्या ग्रामीण भागांत २००० हजार मोटर ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यासाठी अर्थसाह्य देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांवर सर्वाधिक अपघात होणारी ८०० ठिकाणी निश्चित केली. त्या ठिकाणी ८०० रुग्णवाहिकांची सोय केली जाणार आहे.
मोटरवाहन कायद्याचा वटहुुकूम निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:53 AM