भोपाळ - जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल 30 ते 35 फूट उंच दगड उडाल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरजवळील डुंडी येथे कटनी-बीनासाठी तिसरी रेल्वे लाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.
रेल्वे ट्रॅकच्या मार्गात एक डोंगर येत होता. त्यामुळे डोंगराला स्फोटकांच्या मदतीने बोगदा पाडण्याचं काम सुरू होतं. मात्र यामध्ये भीषण स्फोट झाला आणि 30 ते 35 फूट उंच दगड उडाले. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवरही मोठ्या संख्यने दगड कोसळल्यामुळे त्याचं खूप नुकसानही झालं आहे. याच दरम्यान रेल्वे ट्रकवर एक ट्रेनही उभी होती. त्यामुळे ट्रेनवरही दगड कोसळले. मात्र या ट्रेनमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती देण्यात आली आहे.
...अन् अनर्थ टळला, Video व्हायरल
जबलपूर झोनच्या सीपीआरओ प्रियंका दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कामासाठी ज्या डोंगराला स्फोटाने उडवण्यात आलं ते काम करणारी कंपनी ही अत्यंक अनुभवी कंपनी आहे. संपूर्ण नियोजनानंतर हे करण्यात आले. मात्र मोठ्या स्फोटामुळे ओव्हरहेड वायरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुन्हा अशी चूक होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निश्चित काळजी घेण्यात येईल असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना
बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ
Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड