ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १८ - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. आंदोलनासाठी निघालेल्या हार्दिकला राजकोट - जामनगर महामार्गावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले असून हार्दिकला ताब्यात घेतल्याने या सामन्यातील विघ्न टळले आहे.
पटेल समाजाच्या लोकांना सामन्याची तिकीटे दिली नाहीत असा आरोप करत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेलने राजकोट येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना उधळून लावण्याची धकमी दिली होती. यानंतर शनिवारी रात्रीपासून राजकोटमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून पोलिसांचा फौजफाटाही स्टेडियम परिसरात तैनात कऱण्यात आला आहे. रविवारी सकाळी आंदोलनापूर्वी पोलिसांनी हार्दिकला ताब्यात घेतले.