चेन्नई : तामिळनाडूवर संस्कृत भाषा थोपविण्यात आली तर राज्यात पुन्हा एकदा ‘हिंदीविरोधी’ आंदोलनासारखे मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी दिला आहे. तामिळनाडून वैदिक शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने एक मंडळ स्थापन करण्याचा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा विचार आहे, असे वृत्त मीडियात झळकल्यानंतर करुणानिधींनी सोमवारी हा इशारा दिला. पत्रकारांशी बोलताना करुणानिधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, तामिळनाडूमध्ये संस्कृतचे समर्थन करणारे मूर्ख आहेत. सत्तारूढ अण्णाद्रमुक भाजपाचे तळवे चाटत आहे आणि तामिळनाडूला उद्ध्वस्त करू पाहात आहे.
संस्कृत लादल्यास द्रमुकचे आंदोलन
By admin | Published: June 15, 2016 4:04 AM