अहमदाबाद : गुजरातेत पटेल समाजास ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अहमदाबादेत मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीनंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना अटक व सुटका झाली. अटकेनंतर मंगळवारी रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने सुरत, मेहसाणा, अहमदाबादेत वाहनांची जाळपोळ केली.अहमदाबादेतील सोला भागात जमावाने पोलीस ठाणेच पेटवून दिले, तर सुरतमध्येही पोलिसांची जीप पेटवून दिली. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले आहे. तथापि, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. १९८५ मध्ये आम्ही गुजरातेतून काँग्रेसला हद्दपार केले होते. आज भाजप सत्तेवर आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही. -हार्दिक पटेल
पटेलांचे आंदोलन पेटले
By admin | Published: August 26, 2015 5:20 AM