शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

साधू-संत निवडणुकीच्या 'आखाड्यात'; अनेकांना भाजपाकडून हवं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 2:42 PM

भाजपानं तिकीट न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारी सुरू

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अनेक साधू-संत आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारनं एप्रिलमध्ये पाच बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. यामुळे साधू-संतांमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली असून आतापर्यंत आखाड्यात रमणाऱ्या बाबांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्या अनुयायांमध्ये कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी नामदेव त्यागी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. मात्र मी भाजपावर तिकिटासाठी दबाव आणणार नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मी तयार आहे, अशा शब्दांमध्ये कॉम्प्युटर बाबांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. कॉम्प्युटर बाबांना इंदूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं त्यांच्या एका अनुयायानं सांगितलं. कॉम्प्युटर बाबांनी नर्मदा नदीच्या तटांजवळ करण्यात आलेल्या वृक्षारोपणात घोटाळा झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी केला होता. याविरोधात त्यांनी नर्मदा घोटाळा रथ यात्रा काढण्याची तयारीदेखील सुरू केली होती. यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळताच त्यांनी नर्मदा घोटाळा रथ यात्रा रद्द केली. रामचरित मानसमध्ये पदवी घेतलेल्या 47 वर्षांच्या बाबा अवधेशपुरी यांना उज्जैनमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आपले विश्व हिंदू परिषद आणि संघाशी चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'भाजपा व्हेंटिलेटरवर असल्यापासून मी पक्षासाठी काम करत आहे. तिकिटासाठी मी भाजपावर दबाव आणणार नाही. मी निवडणूक लढवावी, अशी माझ्या अनुयायांची इच्छा आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन,' असं बाबा अवधेशपुरी यांनी सांगितलं. संत मदन मोहन खडेश्वरी महाराज यांना सिवनी जिल्ह्यातील केवलारी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. 'माझा विजय निश्चित आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवेन. गेल्या 30 वर्षांपासून मी केवलारीमध्ये काम करत आहे,' असं खडेश्वरी महाराज यांनी म्हटलं. याशिवाय रायसेन जिल्ह्यातील रविनाथ महिवाले, बाबा महेंद्र प्रताप गिरी यांनाही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानElectionनिवडणूकBJPभाजपा