Digvijaya Singh : "भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका"; दिग्विजय सिंह यांचं जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:44 PM2023-10-29T12:44:00+5:302023-10-29T12:50:35+5:30
Digvijaya Singh : मध्य प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांदरम्यान दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे.
मध्य प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांदरम्यान दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, मी सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती करतो की, काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसमध्ये एकजूट आहे. आपण सगळे मिळून काम करू आणि भाजपाचा पराभव करू, ‘जनशक्ती’ जिंकेल, पैसा हरेल. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले, "मी 30 (ऑक्टोबर) रोजी दतियाला जात आहे. दतियामध्ये नरोत्तम मिश्रा यांच्याविरोधात जनतेत रोष आहे. मी तिथे जाईन आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार जेव्हा अर्ज दाखल करतील, तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. हा बदल घडून आला आहे. जनतेला जो बदल हवा आहे, त्याच बदलासाठी आम्ही जनतेला या भ्रामक प्रचारापासून दूर राहण्याचे आवाहन करतो. भाजपा आपल्या पैशाच्या ताकदीचा वापर करून खोट्या बातम्या पसरवत आहे. ही त्यांची रणनीती आहे."
मेरी सभी मतदाता भाइयों एवं बहनों से प्रार्थना है कि वे कांग्रेस नेताओं में फूट के भाजपा के भ्रामक प्रचार के झांसे में न आएं। कांग्रेस एक जुट है। हम लोग सब मिलकर काम करेंगे और भाजपा को हराएंगे "जन बल" जीतेगा, "धन बल" हारेगा। कमलनाथ जी के नेतृत्व में कांग्रेस की सरकार बनेगी। pic.twitter.com/J5mtH7Wwxt
— digvijaya singh (@digvijaya_28) October 29, 2023
काय म्हणाले दिग्विजय सिंह?
दिग्विजय सिंह म्हणाले की, राज्यात सरकार एकतर काँग्रेस किंवा भाजपाचे बनणार आहे. या छोट्या पक्षांकडून येथे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही. लोकांना बदल हवा आहे आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ही 20 वर्षांची कुशासन संपवून राज्यात काँग्रेसची सत्ता आणाल. काँग्रेसच्या राजवटीत आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करू. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.