भोपाळ: कर्नाटकात काँग्रेस, जेडीएस सरकार कोसळल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती घडेल, असा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला. कर्नाटकात ऑपरेशन लोटस राबवल्यानंतर मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमलनाथ' सुरू केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.
कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 7:27 PM