शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:28 PM2020-07-26T14:28:01+5:302020-07-26T14:37:49+5:30
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे. त्यांनी आवाहन केले, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी.
भोपाळ -मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अनेक महत्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल शिवराज सिंह यांचे मनोबल वाढवणाऱ्या आहेत. चाचण्यांच्या आलेल्या अहवालानुसार शिवराज सिंह यांना कोरोनाचा काही प्रमाणातच संसर्ग झाला आहे. त्यांच्या शरिरात कोरोना अधिक पसरलेला नाही.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सुरक्षिततेचा भाग म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी आवाहन केले आहे, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने स्वतःचीच चाचणी केली होती. याचाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 25 जुलैला ते रुग्णालयात भरती झाले होते.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर आज शिवराज सिंह यांनी एका-पाठोपाठ एक असे तीन ट्विट करत कोरोना वॉरियर्सची प्रशंसा केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी सर्वांनीच सहा फूट अंतर, हात वारंवार धूने आणि मास्क लावणे, हे कोरोनापासून बचावाचे सर्वोत्तम शस्त्र असल्याचे सांगितले आहे,
प्रिय प्रदेशवासियों, आपको #COVID19 से डरने की जरूरत नहीं है। लक्षण प्रकट होते ही टेस्ट कराएं और पॉजिटिव होने पर तत्काल इलाज शुरू करवाएं तो कोरोना पर विजय अवश्य मिलेगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 26, 2020
इससे लड़ने का प्रमुख अस्त्र है, मास्क और दो गज की दूरी। इन अस्त्रों का प्रयोग अवश्य करें। #MPFightsCoronapic.twitter.com/Pyu2h6gAia
महत्त्वाच्या बातम्या -
"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर