शिवराज सिंह चौहान राहुल गांधींवर संतापले, अब्रुनुकसानीचा खटला करणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:56 AM2018-10-30T08:56:12+5:302018-10-30T10:29:41+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे.
भोपाळ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या राहुल गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. झाबुआ येथे सोमवारी (29 ऑक्टोबर) जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले. ते म्हणाले की, ''शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सच्या यादीमध्ये आले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचेही नाव पनामा पेपर्समध्ये आले. पाकिस्तानसारख्या देशानंही त्यांची कारागृहात रवानगी केली. पण येथील मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जात नाही''.
BJP mein itna brashtachaar hai ki main kal confuse ho gaya tha. Madhya Pradesh ke CM ne Panama nahi kiya unhone to e tendering aur vyapam scam kiye hain: Rahul Gandhi on his earlier remark that MP CM's son was named in Panama papers (file pic) #MadhyaPradeshpic.twitter.com/wzqWm4vQQk
— ANI (@ANI) October 30, 2018
Name of the son of CM Shivraj Singh Chauhan surfaced in the Panama papers, but no action was taken. Even a country like Pakistan punished its former PM when he was named in the Panama papers: Rahul Gandhi in Jhabua yesterday. #MadhyaPradeshpic.twitter.com/WJ6OOQ3SCT
— ANI (@ANI) October 30, 2018
याविरोधातच चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राजकीय भाषणादरम्यान आपल्या मुलाच्या नावाचा विनाकारण उल्लेख करण्यात आल्याच्या कारणामुळे शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात रात्री उशिरा ट्विट करत त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी (30ऑक्टोबर) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे.
पिछले कई वर्षों से कांग्रेस मेरे और मेरे परिवार के ऊपर अनर्गल आरोप लगा रही हैं। हम सबका सम्मान करते हुए मर्यादा रखते हैं, लेकिन आज तो @RahulGandhi जी ने मेरे बेटे @yuva_kartikey का नाम पनामा पेपर्स में आया है कहा कर, सारी हदें पार कर दी! कल ही हम उन पर मानहानि का दावा कर रहे है।
— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) October 29, 2018
आज @RahulGandhi जी ने मुझे ‘पनामा पपेर्स’ में संलिप्त होने का झूठा बयान दिया है।मैं व्यथित हूँ कि बचपने की आड़ में सार्वजनिक मंच से मेरी व मेरे परिवार की प्रतिष्ठा खंडित की गई है।
— Kartikey Singh Chauhan (@yuva_kartikey) October 29, 2018
यदि 48 घंटे में उन्होंने माफी नहीं मांगी तो मैं उनपर कठोरतम कानूनी कार्यवाही के लिए बाध्य हो जाऊँगा
पुढे ते असंही म्हणालेत की, 'गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करत आहे. आम्ही सर्वांचा सन्मान ठेऊन मर्यादा पाळतो. मात्र आजतर राहुल गांधींनी माझ्या मुलाचं नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून सर्व सीमाच पार केल्या आहेत. याबाबत आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत.'
शिवराज यांच्या मुलानंही केलं ट्विट
शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहाननंही राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात ट्विट करत म्हटलं की, पनामा पेपर्समध्ये माझं नाव आल्याचं खोटे विधान राहुल गांधी यांनी केले. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा खराब करण्यात आल्यानं मी दुःखी आहे. 48 तासांच्या आत त्यांनी माफी नाही मागितली तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईसाठी पाऊलं उचलेन.