नवी दिल्ली- मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या राज घराण्यातले राजपुत्र आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. शिंदे यांनी ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गोटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामा पाठवून दिला आहे. काँग्रेसचे आणखी सात आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. या 19 आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचाही समावेश आहे. ज्यांनी मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सध्या हे आमदार कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये आहे. या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिंदेंच्या या बंडखोरीनंतर काँग्रेसनं त्यांना गद्दार म्हटलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. शिंदेबरोबर गेलेल्या सहा मंत्र्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी कमलनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10 हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत
'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी
Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना