मध्य प्रदेशच्या इंदुर जिल्ह्यात एका व्यक्तीचं जीवन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे खराब झालंय. डॉक्टरांनी या व्यक्तीच्या डोक्यातून हाडंच काढून टाकलंय. जेव्हा ते पुन्हा लावण्यासाठी रूग्णाने डॉक्टरांशी संपर्क केला तर समजलं की, ते हाड नष्ट करण्यात आलंय. व्यक्तीने डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्याचं म्हणणं आहे की, डॉक्टरमुळे त्याचं जीवन खराब झालंय.
मीडिया रिपोर्टनुसार, उज्जैनच्या कीर्ती परमारला काही वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमर झाला होता. २०१९ मध्ये तो ऑपरेशनसाठी इंदुरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला होता. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या डोक्याच्या एका भागातून हाड काढून टाकलं. त्यांनी कीर्ती यांना सल्ला दिला की, जेव्हा रिकव्हरी होईल तेव्हा ते हाड पुन्हा लावण्यात येईल.
काही महिन्यांनी जेव्हा रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की, त्यांनी ते डोक्याचं हाड नष्ट केलं. प्रबंधक म्हणाले की, हाड नष्ट करण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिली होती. तर नातेवाईक म्हणाले की, त्यांनी अशी परवानगी कधीच दिली नाही. उलट ते म्हणाले होते की, काही काळाने दुसरं ऑपरेशन करून हाड पुन्हा लावण्यात येईल.
रूग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलच्या प्रबंधाकावर आता आरोप लावत आहेत. ते म्हणाले की, डोक्याचं ऑपरेशन करून पुन्हा हाड लावण्याचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त आहे. यातही हाडावर जास्त खर्च होत आहे. डोक्याच्या हाडाशिवाय रूग्णाचा चेहरा अर्धवट वाटत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक्षक राजेश रघुवंशी म्हणाले की, उज्जैनच्या रूग्णाने एका खाजगी हॉस्पिटल विरोधात तक्रार दिली आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.