ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार ई अहमद यांची प्रकृती बिघडली. यावेळी संसदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांना प्रथमोपचार दिले. त्यानंतर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ई अहमद यांनी मंगळवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.
केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे ई अहमद खासदार होते. तसेच, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.
IUML MP E Ahamed passes away, he was rushed to the hospital yesterday morning from Parliament during President's address. pic.twitter.com/wS0X4Pli6K— ANI (@ANI_news) January 31, 2017