- शीलेश शर्मा, नवी दिल्लीसंघ परिवाराकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांना खासदार निधीतून आर्थिक मदत पोहोचवत शिक्षणाच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांना वेग दिला जात आहे. खासदार निधीसाठी निवडण्यात आलेल्या बहुतांश शिक्षण संस्था अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील आहेत.हरियाणातील मेवातसह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारसह काही राज्यांमधील शहरे आणि गावांचा या यादीत समावेश आहे. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने संघ परिवारातील संस्थांना आर्थिक मदत देण्यात पूर्ण स्वारस्य दाखविल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचीही अडचण वाढली आहे. राज्यसभेतील भाजपच्या खासदारांसमोर तर बिकट समस्या उभी ठाकली आहे. त्यांना संपूर्ण राज्यातील प्रकल्पांसाठी निधी पुरविण्याचा अधिकार असतो. त्यांना संबंधित राज्यांतील शिक्षण संस्थांना मदत देण्याचे आदेश पोहोचताच ते काम हाती घ्यावे लागले. चांगल्या सुविधा पुरविता याव्यात, लोकांना आकर्षित करता यावे, यासाठी संघ परिवारातील शाळांनी संबंधित खासदारांकडे निवेदन द्यावे, असे निर्देशही या संस्थांकडे पोहोचले आहेत.
संघ परिवाराच्या शाळांना खासदार निधीतून मदत
By admin | Published: October 09, 2015 5:19 AM