"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 3, 2021 02:24 PM2021-02-03T14:24:57+5:302021-02-03T14:26:26+5:30
"हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील."
भोपाळ - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीला लागून असलेल्या विविध राज्यांच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सरकार आणि आंदोलक शेतकरी, यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या. मात्र, कुठल्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नरोत्तम मिश्रा म्हणाले, हे शेतकऱ्यांचे आंदोलन एक प्रयोग आहे. जर हे यशस्वी ठरले, तर लोक सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. हे कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. एवढेच नाही, तर हे आंदोलन केवळ गृहितकांवरच आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.
Farmers' stir is an experiment. If it's successful, then people will start protests against CAA-NRC, Article 370&Ram Temple. Nobody has been able to explain 'what's so black about the black law' (farm laws). These protests are based on assumptions:MP Home Minister Narottam Mishra pic.twitter.com/1G9pg5RDDd
— ANI (@ANI) February 3, 2021
कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर
शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात होऊ शकतो हिंसाचार -
२६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुप्तचर यंत्रणांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्राणघातक शस्त्रे लपविण्यात आली आहेत. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिंधु बॉर्डर आणि टीकरी बॉर्डर अतिसंवेदनशील आहे. २६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. लाल किल्ल्यासारख्या घटनेप्रमाणेच धारदार शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरविण्याचा संबंधितांचा हेतू असेल. हरियाणाला लागून असलेल्या सीमा भागात धोका अधिक असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील गुंडांसह देशविरोधी शक्ती या आंदोलनात उतरल्या आहेत, यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत.
रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ -
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांची घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.