खासदार कंगना रणौत यांनी काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या टीकेनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वाढता वाद पाहता पक्षाने आता अधिकृत निवेदन जारी करून कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून, कंगनाला भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?
एका मुलाखतीत खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, जर आमचे नेतृत्व मजबूत नसते तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेशात रूपांतर झाले असते. कंगना राणौतच्या या वक्तव्यावर विरोधकांनी हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसने कंगनावर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपनेही कंगनाच्या वक्तव्यावर टीका केली. तिचे हे वैयक्तिक विधान असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
कंगना रणौतच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, "भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना राणौतच्या विधानावर असहमत आहे. पक्षाच्या वतीने धोरणावर बोलण्यासाठी कंगना रणौतला अशी विधाने करण्याची परवानगी नाही किंवा त्यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत.
एका मुलाखतीत भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या होत्या की, आमचे सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ शकली असती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झाले ते सर्वांनी पाहिले. निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, फासावर लटकवले जात होते. जेव्हा हे विधेयक मागे घेण्यात आले तेव्हा सर्वच भोंदूबाबांना धक्का बसला. कारण त्याचं नियोजन खूप लांबलचक होतं, असंही कंगना रणौत म्हणाली.