Video - फोनवर बोलत असल्याने कार चालकाला रोखलं; 'त्याने' पोलिसाला बोनेटवरून फरफरटत नेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:02 PM2022-12-13T13:02:43+5:302022-12-13T13:12:20+5:30

पोलीस कर्मचाऱ्याने कार चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच कार घातली आणि बोनेटवरून त्याला फरफटत नेलं.

mp man driving car dragged traffi policeman on the bonnet in indore here is cctv | Video - फोनवर बोलत असल्याने कार चालकाला रोखलं; 'त्याने' पोलिसाला बोनेटवरून फरफरटत नेलं

Video - फोनवर बोलत असल्याने कार चालकाला रोखलं; 'त्याने' पोलिसाला बोनेटवरून फरफरटत नेलं

googlenewsNext

मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका ट्रॅफिक पोलिसाने कार चालकाला रोखल्यानंतर त्याने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने कार चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली आणि बोनेटवरून त्याला फरफटत नेलं आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर चौकात ड्युटीवर असताना ट्रॅफिक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल शिव सिंह चौहान यांनी कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला मोबाईलवर बोलत असल्यामुळे थांबवलं आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर बोलत असलेल्या कार चालकाला मी थांबवलं. दंड भरण्यास सांगितले परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

कार चालवणाऱ्या व्यक्तीने वेग वाढवला तेव्हा ट्रॅफिक पोलीस हेडकॉन्स्टेबल चौहान बोनेटवर पडले आणि स्वत: जीव वाचवण्यासाठी त्याने बोनेट पकडून ठेवलं. पण तरीही आरोपी लांबपर्यंत गाडी चालवत राहिला. भरधाव वेगाने कार चालवत असताना आरोपी डावीकडे व उजवीकडे वळवत राहिला जेणेकरून पोलीस कर्मचारी खाली पडेल, मात्र हेड कॉन्स्टेबल शिव सिंह चौहान बोनेटला लटकत राहिले. मागून आणखी पोलीस पोहोचले आणि त्यांनी गाडी थांबवली.

पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याचे नाव केशव उपाध्याय असल्याचं समोर आलं आहे. याचदरम्यान आरोपीने पोलिसांशी गैरवर्तनही केले आहे. झडतीमध्ये पोलिसांनी एक शस्त्रही जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mp man driving car dragged traffi policeman on the bonnet in indore here is cctv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.