शत्रुघ्न सिन्हांनी केले राहुल गांधींचे कौतुक, पक्ष नेतृत्व म्हणाले- हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:58 PM2023-02-10T15:58:09+5:302023-02-10T15:58:54+5:30

Shatrughan Sinha News: राहुल गांधींनी संसदेत केलेल्या भाषणाचे शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले.

MP Shatrughan Sinha praised Rahul Gandhi, party leadership said - this is his personal statement... | शत्रुघ्न सिन्हांनी केले राहुल गांधींचे कौतुक, पक्ष नेतृत्व म्हणाले- हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य...

शत्रुघ्न सिन्हांनी केले राहुल गांधींचे कौतुक, पक्ष नेतृत्व म्हणाले- हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य...

googlenewsNext


TMC News: अभिनेते-राजकारणी आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधींचे कौतुक केले. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधींच्या याच संसदेतील भाषणाचे कौतुक केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा चर्चेत आले, पण त्यांच्या पक्षाने वेगळीच भूमिका घेतली आहे.

शुक्रवारी शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर राहुल गांधींच्या भाषणाचे कौतुक केले. त्याचबरोबर या प्रकरणी गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. 'आम्ही सर्वांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील 1.5 तासांचे भाषण ऐकले, परंतु दुर्दैवाने त्यात काही अर्थ नव्हता. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मोदींनी दिले नाही. सर्वजण राहुल गांधींचे कौतुक करत आहेत. तुमच्या ज्ञानासाठी हे पहा. जय हिंद', असे ट्विट सिन्हा यांनी केले. या ट्विटमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केला आहे.

वक्तव्यापासून टीएमसीने स्वतःला दूर केले
तृणमूल काँग्रेस नेतृत्वाने सिन्हा यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डॉ. संतनु सेन यांच्या मते, सिन्हा यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे, पक्षाचा या भूमिकेशी संबंध नाही. सेन पुढे म्हणाले, काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली, हे चांगलं आहे. आता पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी नेतृत्वाने प्रयत्न करावेत.

यापूर्वीही कौतुक केले आहे
सिन्हा यांनी राहुल गांधींची स्तुती केल्याने तृणमूल काँग्रेसला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. 9 जानेवारी रोजी शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी हे युवकांचे आयकॉन असून ते एक गंभीर नेते म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याविरोधात जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, ती त्यांनी नष्ट केली आहे, असे म्हटले होते. 

Web Title: MP Shatrughan Sinha praised Rahul Gandhi, party leadership said - this is his personal statement...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.