योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्कदार्जिलिंग : निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून, यंदा भाजपा-तृणमूल व काँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. या गोरखाबहुल मतदारसंघात स्थानिक पक्षांच्या पारड्यात किती मते येतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. भाजपाकडून सलग चौथ्यांदा येथून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. काँग्रेस व तृणमूलकडून गोरखा मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
या मतदारसंघातील जवळपास अर्धे मतदार गोरखा आहेत. नेपाळी भाषिकांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. सातत्याने तीनवेळा भाजपाने या जागेवरून विजय मिळवला असला, तरी गोरखालॅंडबाबत ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही.
मतदारसंघातील प्रमुख मुद्दे- गोरखालॅंडची अनेक वर्षांपासूनची मागणी- रोजगाराचा व मुलभूत सुविधांचा अभाव- डोंगराळ भागात विकास पोहोचविण्याचे आव्हान- भूमिपुत्रांच्या मुद्यावरून तापलेले राजकारण- नेपाळ, भूतान, चीन आणि बांगलादेश या देशांच्या जवळ असल्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा मतदारसंघ - स्थानिक निवडणुकांत येथील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसते.
२०१९ मध्ये काय घडले ? राजू बिश्त भाजप ७,५०,०६७ अमरसिंह राय तृणमूल ३,३६,६२४