मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू, घराच्या छताचंही मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:54 PM2021-06-04T15:54:47+5:302021-06-04T15:58:58+5:30

घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

MP Young man died when power bank exploded while charging mobile roof also exploded in umaria | मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू, घराच्या छताचंही मोठं नुकसान

मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू, घराच्या छताचंही मोठं नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देघरात मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घराच्या छताचे मोठे नुकसान झाले गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता.घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

उमरिया - मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. येथे घरात मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घराच्या छताचे मोठे नुकसान झाले असून भिंतींवरही स्फोटाच्या खुना दिसत आहेत. तसेच, मोबाईल चार्ज करत असलेला युवकही या स्फोटात गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (MP Young man died when power bank exploded while charging mobile roof also exploded in umaria)

ही घटना उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता. मोबाईल त्याच्या हातातच होता. यावेळी अचानकपणे पॉवर बँकचा स्फोट झाला आणि घरात धावपळ उडाली. या स्फोटामुळे घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत. याच बरोबर मोबाईल चार्ज करणारा तरूणही घरात जखमी अवस्थेत पडला होता.

CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!

घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. संबंधित पॉवर बँक नेमकी कोणत्या कंपनीची होती, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, घटनेनंतर पॉवर बँकच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उमरिया हा मध्य प्रदेशातील एक मागास जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत विजेची मोठी समस्या आहे. यामुळे येथील लोक मोबाईलसाठी पॉवर बँकचा वापर करतात. 

CoronaVirus : शाब्बास सूनबाई! 75 वर्षांच्या सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर बसवून गाठलं रुग्णालय! 

 

Web Title: MP Young man died when power bank exploded while charging mobile roof also exploded in umaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.