शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशभरातील वाघांची घटती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वर्षभराचा कार्यकाळ असलेला १५ खासदारांचा सल्लागार गट स्थापन केला आहे. या गटात राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचा समावेश असून स्वत: जावडेकर या गटाचे अध्यक्ष आहेत.व्ही. पी. सिंग बदनोरे, ए. यू. सिंग देव, रणविजय सिंग जुदेव, चंदन मित्रा, नीरज शेखर, तरुण विजय हे सर्व राज्यसभा सदस्य, तसेच दुष्यंतसिंग, कलिकेश सिंग, सुशीलकुमार सिंग, कीर्तीवर्धन सिंग, अर्का केशरी देव, नगेंद्रसिंग, परिमल नथान आणि पी. डी. राय या लोकसभा सदस्यांनाही या गटात स्थान देण्यात आले असल्याचे मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. विविध व्याघ्र संरक्षण प्रकल्पांचा दौरा करून शिकारीच्या समस्येवर तोडगा काढण्यासह त्यामागची कारणे आणि शिकाऱ्यांचा शोध लावला जावा, असा आग्रह जावडेकरांनी धरला आहे.
वाघांच्या शिकारी रोखण्यासाठी खासदारांचा गट
By admin | Published: July 24, 2015 11:18 PM