श्री रामचरित मानस पारायणाची सांगता
By admin | Published: September 07, 2015 11:27 PM
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात संगीतमय रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाचा सांगता समारंभ आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास विजय वासन, विजय गोयल, प्रमोद अग्रवाल, अजय अग्रवाल, सुरेश गोयल, स्वामी शिवजी महाराज बलसाड, स्वामी गोपालनंद सरस्वती बरुमाल, स्वामी शिवानंदजी सरस्वती बरुमाल, पूज्य ब्राचारी विष्णू चैतन्य महाराज ग्वालियर, नंदकिशोर शास्त्री महाराज आदि उपस्थित होते. या सोहळ्यास संपूर्ण भारतातून आणि विशेषत: गुजरात, ग्वालियर, मध्य प्रदेश येथील भक्तगणांचा महासागर लाभला होता.
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात संगीतमय रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाचा सांगता समारंभ आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास विजय वासन, विजय गोयल, प्रमोद अग्रवाल, अजय अग्रवाल, सुरेश गोयल, स्वामी शिवजी महाराज बलसाड, स्वामी गोपालनंद सरस्वती बरुमाल, स्वामी शिवानंदजी सरस्वती बरुमाल, पूज्य ब्राचारी विष्णू चैतन्य महाराज ग्वालियर, नंदकिशोर शास्त्री महाराज आदि उपस्थित होते. या सोहळ्यास संपूर्ण भारतातून आणि विशेषत: गुजरात, ग्वालियर, मध्य प्रदेश येथील भक्तगणांचा महासागर लाभला होता.मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ शिकविणारी आणि जीवनाचा खरा मार्ग दाखविणारी श्री रामचरित मानस कथा ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श मार्गदर्शक आहे. आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची शिकवण रामकथा देते. महाराजांच्या वाणीत अतिशय मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या संगीतमय रामचरित मानस पारायणास रामकथेच्या निरुपणाचा सोहळा होम-हवन व महाप्रसाद आदि धार्मिक विधींनी संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच गरजूंना वस्त्रदानदेखील करण्यात आले.दरम्यान, बुधावारपासून (दि. ९) चिंतामणी मंगल कार्यालयात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळात राजस्थान येथील स्वामी जगदीश पुरीजी महाराज यांच्या मधुरस्वरात श्रीमद्भागवतज्ञान यज्ञास सुरुवात होत आहे. या मंगलमय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांनी केले अहे.फोटो कॅप्शनरामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाच्या सांगता समारंभात उपस्थिताना मार्गदर्शन करताना स्वामी विद्यानंद सरस्वती महाराज. दुसर्या छायाचित्रात महाआरती करताना भाविक. शेवटच्या छायाचित्रात विद्यार्थ्यांना वस्त्रदान करताना विजय वासन व स्वामी शिवजी महाराज बलसाड.