ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २८ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारतातून पाकिस्तानी कलाकारांना मोठया प्रमाणावर विरोध होत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानातही भारतीय चित्रपटांबद्दल नकारात्मक भावना आहे.
उद्या प्रदर्शित होत असलेल्या एमएस धोनी चित्रपटाला याचा फटका बसला आहे. भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आधारीत 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. पाकिस्तानी वितरकांनी हा चित्रपट प्रदर्शित करायला नकार दिला आहे.
आणखी वाचा
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी वितरक हा चित्रपट प्रदर्शित करायला तयार नाहीत. काश्मिर प्रश्नावर तोडगा निघत नाही तो पर्यंत भारतीय चित्रपटांच्या पाकिस्तानातील प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी करणारी एक याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. भारतीय चित्रपटांमुळे पाकिस्तानी आणि काश्मिरी जनतेच्या भावना दुखावतात असे या वकिलाचे म्हणणे होते.