MShield 2.0 For Indian Soldiers : नवी दिल्ली : पाकिस्तानकडून अनेकदा भारतीय जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि त्यांच्याकडून गुप्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशी प्रकरणे अनेक वेळा समोर आली आहेत. मात्र, आता भारतीय लष्कराने असे एक ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्र कधीही भारतीय जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवू शकणार नाही.
या ॲप्लिकेशनचे नाव MShield 2.0 आहे. जवानांकडून नकळत कोणतीही माहिती लीक होऊ नये, यासाठी हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन फक्त लष्कराचे जवान डाउनलोड करू शकतात. तसेच, कोणत्याही लष्करी जवानाने कोणतेही बनावट ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे की नाही, हे फक्त अधिकाऱ्यांनाच कळते. हे MShield 2.0 हे देखील सांगते की कोणताही PIO कॉल आला आहे की नाही, जो बहुतेकदा हनी ट्रॅपमध्ये केला जातो.
लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या ॲप्लिकेशनचा वापर केल्यानंतर, आतापर्यंत हनी ट्रॅपचा एकही प्रकार घडला नाही. या मोबाईल ॲप्लिकेशनची खास गोष्ट म्हणजे ते फक्त लष्करी जवानच वापरतात आणि कोणताही जवान जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे या हनीट्रॅपचा बळी पडू नये, यासाठी लष्कराने हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. दरम्यान, याबद्दल कॅप्टन शिवानी तिवारी म्हणाल्या की, सध्या हे ॲप्लिकेशन आमच्या रोमियो फोर्समध्ये वापरले जात आहे आणि पेन आर्मीमध्ये हे ॲप्लिकेशन सादर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
हनी ट्रॅप म्हणजे काय?शत्रू राष्ट्राकडून जवानांसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. यात एक सुंदर महिला जवानांच्या संपर्कात येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लाईक पासून सुरू झालेला संपर्क वाढवण्यात येतो. काही कालावधीमध्येच ती महिला त्या जवानांकडून अथवा अधिकाऱ्यांकडून शस्त्रे, तळ, विमाने इत्यादी महत्त्वाची माहिती काढून घेते. ज्यावेळी, हे सैनिकाला लक्षात येते की आपली फसवणूक झाली आहे. तो पर्यंत शत्रू राष्ट्रांकडे ही माहिती पोहचलेली असते.