नवी दिल्ली- मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत शेतक-यांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. हमीभाव वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, तांदूळसह इतर 14 पिकांचा समावेश आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटलनं वाढ करण्यात आली असून, 14 पिकांचा हमीभाव दीडपटीनं वाढवला आहे. त्यामुळे खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे. या 14 पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)- कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
बळीराजाला 'राजा'चा आधार; ही 14 पिकं (हमी)भाव खाऊन जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 3:36 PM