शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 7:03 PM

honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

जयपूर : गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एमटीएस रवी प्रकाश मीणा याला अटक केली आहे. आरोपी रवी प्रकाश मीणा हनीट्रॅपमध्ये अडकून देशाची सामरिक माहिती पाकिस्तानी हस्तकांना देत ​​होता. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी सुरक्षा यंत्रणा एकवटल्या आहेत.

पोलीस गुप्तचर विभागाचे डीजी महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थांकडून सुरू असलेल्या हेरगिरीच्या कारवायांवर सतत  सीआयडी इंटेलिजन्स लक्ष ठेवून होते. यादरम्यान, करौली येथील रहिवासी असलेला एमटीएस रवी प्रकाश मीना हा दिल्लीतील लष्करी भवनात तैनात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली.

सीआयडीच्या गुप्तचर पथकांनी आरोपी रवी प्रकाश मीणा याच्यावर नजर ठेवली असता, हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर रवी प्रकाश मीणा हा पाकिस्तानच्या महिला एजंटच्या संपर्कात असल्याचे समोर आले. महिला एजंटच्या सांगण्यावरून पाकिस्तानी एजंटला रवी प्रकाश मीणा सामरिक महत्त्वाची माहिती पाठवत होता. त्यामुळे सीआयडी इंटेलिजन्स, मिलिटरी इंटेलिजन्स, सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो आणि सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त चौकशी केली.

चौकशीदरम्यान असे समोर आले की, आरोपी रवी प्रकाश मीना हा फेसबुकच्या माध्यमातून महिला पाकिस्तान एजंटच्या संपर्कात आला. पाकिस्तानी महिला एजंटने स्वत:ची ओळख पश्चिम बंगालमधील रहिवासी अंजली तिवारी अशी करून दिली होती. लष्करात कार्यरत असल्याचा दावा करत महिलेने रवी प्रकाश मीणा याला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि सोशल मीडियावर माहिती मिळवली. 

तसेच, अनेक वेळा माहिती देण्याच्या बदल्यात रवी प्रकाश मीणा याच्या बँक खात्यात पैसेही जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhoneytrapहनीट्रॅपRajasthanराजस्थान