मू. जे. महाविद्यालयाला जेतेपद
By admin | Published: January 10, 2016 11:27 PM
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व एस.एस.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवारंग महोत्सवात पुन्हा एकदा केसीई सोसायटीच्या मू. जे. महाविद्यालयाचा वरचष्मा दिसून आला. मू. जे. महाविद्यालयाने युवारंग महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपदाचा बहुमान मिळविला आहे. तसेच भुसावळ येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व पी. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयाला या महोत्सवात द्वितीय क्रमांक प्राप्त करत उपविजेते पद मिळविले आहे.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व एस.एस.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवारंग महोत्सवात पुन्हा एकदा केसीई सोसायटीच्या मू. जे. महाविद्यालयाचा वरचष्मा दिसून आला. मू. जे. महाविद्यालयाने युवारंग महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपदाचा बहुमान मिळविला आहे. तसेच भुसावळ येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व पी. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयाला या महोत्सवात द्वितीय क्रमांक प्राप्त करत उपविजेते पद मिळविले आहे. एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रंगमंचावर रविवारी दुपारी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. मंचावर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार), आमदार जयकुमार रावल (शिंदखेडा), प्रसिद्ध सिनेकलावंत समिधा गुरू, श्रम साधना ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, के. एन. पाटील, प्राचार्य डॉ. एस. सी. सूर्यवंशी, आर. एन. खैरनार उपस्थित होते. या स्पर्धेत ५ मुख्य कला प्रकार व २५ उपकला प्रकार घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांची नावे अशी : (अनुक्रमे : स्पर्धेचा प्रकार, क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव व पदक) ० संगीत विभाग : 0 शास्त्रीय गायन : प्रथम- स्नेहल कुलकर्णी, (मू.जे.महाविद्यालय, जळगाव, सुवर्ण पदक), द्वितीय- पूनम पाटील (संगीत विभाग, उमवि, रजत पदक), तृतीय- सुरज बारी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, कांस्य पदक) ० शास्त्रीय वादन (तालवाद्य)- प्रथम- तुषार पुराणिक (भुसावळ कला,विज्ञान व पी. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, सुवर्ण), द्वितीय- राहुल कासार (मू. जे.महाविद्यालय, रजत), तृतीय- सौरभ गुरव (झेड.बी.पाटील, महाविद्यालय, धुळे, कांस्य)० शास्त्रीय वादन (सुरवाद्य)- प्रथम- धनंजय देशमुख (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सुवर्ण), द्वितीय- युवराज सुगम (वाय.एन.चव्हाण महाविद्याल, चाळीसगाव, रजत), तृतीय- ज्युड ऑलवीन स्टुअर्ड, (आय.एम.आर.महाविद्यालय, जळगाव, कांस्य),