नवी दिल्ली - देशात कोरोना बरोबरच ब्लॅक फंगसदेखील वेगाने पसरताना दिसत आहे. कोरोना काळात या अजाराने अनेकांचा बळी घेतला आहे. यावरील उपचार अत्यंत महागडा आहे. विशेष म्हणजे, यावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शनही सध्या सहजपणे मिळताना दिसत नाही. यातच आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी या आजारावरील उपचारावर प्रभावी ठरणारे ओरल सोल्यूशन विकसित केल्याचे वृत्त आहे. हे सोल्यूशन रुग्णांना तोंडाच्या माध्यमाने दिले जाईल.
दोन वर्षांच्या संशोधनानंतर, आता संशोधकांना या औषधावर पूर्ण विश्वास आहे. हे औषध मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी दिले जाऊ शकते, असा विश्वासही या संसोधकांनी व्यक्त केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सोल्यूशन अत्यंत किफायतशीर आहे. 60 मिलीग्रॅमच्या या टॅबलेटची किंमत केवळ 200 रुपये एढी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर सप्तऋषी मजूमदार, डॉ. चंद्र शेखर शर्मा आणि त्यांचे पीएचडी स्कॉलर मृणालिनी गेधाने आणि अनंदिता लाहा या सोल्यूशनवर काम करत होते.
धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस
संस्थेने म्हटले आहे, ''दोन वर्षांच्या अध्यनानंतर संशोधकांना विश्वास आहे, की हे सोल्यूशन मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य फार्मा भागिदाराला हस्तांतरित केले जाऊ शकते.'' तसेच, ''सध्या देशात ब्लॅक आणि इतर प्रकारच्या फंगसच्या उपचारांसाठी कालाजारचा वापर केला जात आहे. तसेच याची उपलब्धता आणि किफायतशीर किंमत पाहता, या औषधाच्या आपत्कालीन आणि तत्काळ परीक्षणाची परवानगी दिली जायला हवी,'' असेही संस्थेने म्हटले आहे.
जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती
शर्मा म्हणाले, हे तंत्रज्ञाण बौद्धिक संपदा अधिकारापासून मुक्त आहे. याचे व्यापक स्थरावर उत्पादन व्हावे. तसेच हे औषध जनतेला सहजतेने उपलब्ध व्हावे.