फौजदाराशी हुज्जत घालणार्या मुफ्ती हारुन नदवी यांना अटक
By admin | Published: January 07, 2016 9:37 PM
जळगाव: तीन सीट दुचाकी चालविणार्या तरुणाविरुध्द कारवाई करणार्या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोला यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांना गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
जळगाव: तीन सीट दुचाकी चालविणार्या तरुणाविरुध्द कारवाई करणार्या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोला यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांना गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.वाहतूक शाखेचे सहायक फौजदार डोले यांची २० डिसेंबर रोजी महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ड्युटी होती. सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी दुचाकीवर तीन सीट जाणार्या तरुणाला अडविले होते. त्या तरुणाने मुफ्ती हारुन यांना फोन करून घटनास्थळावर बोलावून घेतले होते. तेव्हा हारुन यांनी डोले यांच्याशी हुज्जत घालून दुचाकीस्वारावर कारवाई करण्यास मज्जाव केला होता. ३० डिसेंबर रोजी डोले यांच्या फिर्यादीवरुन मुफ्ती हारुन नदवी यांच्याविरुध्द आयपीसी कलम १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासाधिकारी सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी चौकशी अंती ३५३ हे वाढीव कलम त्यांच्यावर लावण्यात आले होते. गुरुवारी सकाळी बागुल यांनी त्यांना अटक केली. न्या.एस.जे.शिंदे यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. जामीन मंजूर करताना गुरुवार व शनिवार पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची अट टाकण्यात आली आहे. आरोपीतर्फे ॲड.जैनोद्दीन शेख यांनी काम पाहिले.