नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये (Netmeds) 60 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील 620 कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली.
RRVL ने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के मालकी खरेदी केली आहे.
या कंपन्यांची स्थापना प्रदीप दधा यांनी केली होती. नेटमेड्स सध्या औषधे, पर्सनल केअर, बेबी केअर सारखी उत्पादने विकते. ही कंपनी अॅपद्वारे डॉक्टर अपॉईंटमेंट बुकिंग आणि डायग्नोसिसची सेवाही देते. नेटमेड्सला जवळपास 1 वर्षापासून खरेदीदाराची प्रतिक्षा होती. कारण मोठ्या प्रमाणावर कंपनीला पैशांची गरज होती.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक ईशा अंबानी यांनी जारी केलेल्या एका पत्रकात याची माहिती देण्य़ात आली. नेटमेड्स सोबत आल्याने रिलायन्स रिटेलची गुणवत्ता आणि स्वस्त हेल्थकेअर उत्पादनांची सेवा देण्यात वाढ होणार आहे.
रिलाय़न्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरू लागली आहे. पुढील काही महिन्यांत मुकेश अंबानींचीरिलायन्स फर्निचर ब्रँड अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केट खरेदी करण्याची शक्यता आहे. (RIL may buy Urban Ladder and Milkbasket) कंपनी आपला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणार आहे. यासाठी लॉन्जरी रिटेलर झिवामी (Zivami) ही कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.अर्बन लॅडरसोबत यासंबंधी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. ही चर्चा आता पुढे सरकली आहे. मात्र डील अद्याप फायनल झालेली नाही. अर्बन लॅडरला रिलायन्स जवळपास 3 कोटी डॉलर म्हणजेच 225 कोटी रुपयांना विकत घेण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग