रिलाय़न्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरू लागली आहे. पुढील काही महिन्यांत मुकेश अंबानींचीरिलायन्स फर्निचर ब्रँड अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केट खरेदी करण्याची शक्यता आहे. (RIL may buy Urban Ladder and Milkbasket) कंपनी आपला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणार आहे. यासाठी रिलायन्सची ईफार्मसी स्टार्टअप नेटमेड्स (Netmeds) आणि लॉन्जरी रिटेलर झिवामी (Zivami) या आणखी दोन कंपन्या खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.
रिलायन्सने काही महिन्यांपूर्वी ने फ्यूचर रिटेल (Future Retail) ची खरेदी केली आहे. या नव्या खरेदी व्यवहाराशी संबंधित 4 अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अर्बन लॅडरसोबत यासंबंधी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. ही चर्चा आता पुढे सरकली आहे. मात्र डील अद्याप फायनल झालेली नाही. अर्बन लॅडरला रिलायन्स जवळपास 3 कोटी डॉलर म्हणजेच 225 कोटी रुपयांना विकत घेण्याची शक्यता आहे.
मिल्क बास्केटच्या बिगबास्केट आणि अॅमेझॉन इंडियासोबत वाटाघाटी सुरु होत्या. मात्र, त्यांचा व्यवहार फिस्कटला. यानंतर बिगबास्केटने डेली निंजाचे अधिग्रहन केले. कोरोना काळात रोजच्या वापरातील पदार्थांची मागणी वाढली होती.
दरम्य़ान, अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केटकडून रिलायन्सशी बोलणी सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेली नाही. त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिल्कबास्केट सध्या कमी फायद्यामध्ये दुधाचा पुरवठा करत आहे. कारण दूध गरजेची वस्तू आहे. तर इतर कंपन्या दुधासोबत अन्य वस्तूही पुरवत आहेत. कारण त्यांचा फायदा वाढू शकेल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार
हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा
शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार