नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोपप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांना मी नमन करतो, असं विधान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. मुखर्जींनी हेगडेवारांची स्तुती केल्यानंतर काँग्रेसकडून संघावर व्हिडीओ 'वार' करण्यात आला आहे.
काँग्रेसनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत संघ संस्थापक हेडगेवार आणि स्वयंसेवकांना टीका केली. स्वयंसेवकांनी सत्याग्रह आंदोलनात सहभागी होऊ नये, असा आदेश संघ संस्थापक हेडगेवारांनी दिल्याची आठवण यावेळी काँग्रेसनं करून दिली. तसेच संघानं वेळोवेळी ब्रिटिशांना मदत केली असून, संघाचा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नाही. संघानं राष्ट्रीय ध्वजालाही विरोध केला होता. नथुराम गोडसेनं गांधीजींची गोळी घालून हत्या केली, त्यावेळी स्वयंसेवकाही तिथे उपस्थित होते.