नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत. कमाल आहे, असे नक्वी यांनी म्हटले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर हे प्रत्येक भारतीयमुस्लीम व्यक्तीला तबलीगी सिद्ध करण्याचे ''तबलिगी शडयंत्र'' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोमवारी ट्विट केले. यात ते लिहितात, ''भारतात कोरोनाचा फैलाव करणारे तबलिगी स्वतःला "कोरोना वॉरियर्स" सांगत आहेत. कमाल आहे. तबलिगी आपल्या अपराधावर खेद करण्याएवजी ते लाखो कोरोना वॉरियर्सचा अपमान करत आहेत. यालाच म्हणतात "चोरी और सीनाजोरी"."
CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध
नक्वी यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "नक्कीच काही राष्ट्रभक्त मुस्लीम व्यक्तींनी गरजूंना प्लाझ्मा दिला आहे. मात्र, त्यांना तबलिगी म्हणणे योग्य नाही. प्रत्येक हिंदुस्तानी मुस्लीम व्यक्तीला तबलिगी सिद्ध करण्याचे "सुनियोजित घाणेरडे तबलिगी शडयंत्र" आहे.
Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान
तबलिगी जमातचे 10 सदस्य दिल्ली येथे कोरोना पीडितांची मदत करत आहेत. त्यांनी त्यांच्या उपचारासाठी प्लाझ्माही दिला आहे. असे असतानाच नकवी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हे सर्वजण दिल्ली येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमातही सहभागी झाले होते. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.