शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान उत्साह : टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दणाणला

By admin | Published: June 19, 2016 12:15 AM

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे शनिवारी संध्याकाळी टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषात मंदिर संस्थानपासून प्रस्थान झाले. रात्री श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम होऊन १९ रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता प्रस्थान होणार आहे.

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे शनिवारी संध्याकाळी टाळ-मृदुंगाचा गजर व मुक्ताबाई, श्रीरामाच्या जयघोषात मंदिर संस्थानपासून प्रस्थान झाले. रात्री श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम होऊन १९ रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता प्रस्थान होणार आहे.
अप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज बाळकृष्ण महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पालखीचे हे १४४ वे वर्ष आहे. मंदिर संस्थानपासून पालखी प्रस्थान होण्यापूर्वी मुंबई येथील चित्रकार शिवराज बांदर यांच्यासह कुमारीकांच्याहस्ते मुक्ताबाईच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. संत मुक्ताबाईने अप्पा महाराजांना जो दृष्टांत दिला त्याचे बांदर यांनी चित्र काढले असून त्याचे या वेळी भाविकांना दर्शन देण्यात आले. त्यानंतर पादुका पालखीत ठेवून पालखीचे प्रस्थान झाले. या वेळी भगवे ध्वज हाती घेतलेल्या व टाळ-मृदुंगाचा गजर करीत निघालेले भाविक लक्ष वेधून घेत होते. आदिशक्ती मुक्ताबाई की जय, भगवान श्रीराम, अप्पा महाराज यांच्या जयघोषासह जय जय रघुवीर समर्थ अशा जयजयकाराने पालखी मार्ग दणाणला होता.
पालखी श्रीराम मंदिर संस्थान येथून निघून भोईटे गढी, कोल्हेवाडा, तळेले वाडा, श्री सद्गुरू बाबजी महाराज समाधी मंदिर, गोपाळपुरा, श्री विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंतनगर मार्गे श्री सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे पोहचली. तेथे रात्री भजन, आरती झाली होऊन तेथे पालखीचा मुक्काम झाला.
१९ रोजी पहाटे ५ वाजता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस पूजाभिषेक, श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुकांना, श्री अप्पा महाराज, वासुदेव महाराज, केशव महाराज समाधी स्थान व बाळकृष्ण महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून पालखीचे प्रस्थान होईल. पालखीस शुभेच्छासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी आदी उपस्थित राहतील. पालखी जिल्हा रुग्णालय रस्ता, संत कंवरराम चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, बाबा हरदासराम चौक, इच्छादेवी चौक, जुना शिरसोली नाका, शिवाजी उद्यान मार्गे मेहरुण जवळील शिवाजी उद्यान येथील श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे पोहोचेल. तेथे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते श्रीसंत मुक्ताबाई पादुका मंदिरात पादुकांचे पूजन होऊन पालखी पुढील प्रवासाला निघेल.