शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 5:29 PM

मुकुल रोहतगी 2014 ते 2017 या कालावधीत अॅटर्नी जनरल होते.

नवी दिल्ली- लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष हे पद रिक्त असल्यामुळे लोकपाल निवडीसाठी विलंब होत होता. केंद्र सरकारने आज आपण मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ या लोकपाल समितीमधील पदावर नेमणूक करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 11 मे रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकपाल समितीत मुकुल रोहतगी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपिठाला सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर 2014 साली रोहतगी यांची नेमणूक महान्य़ायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र जून 2017मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो. यापुर्वी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे 11 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाल्याने ते पद रिक्त होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत