शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल; 91 वर्षीय केके वेणुगोपाल होणार रिटायर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 12:34 PM

Mukul Rohatgi to Become Attorney General : मुकुल रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते.

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) पुन्हा एकदा भारताचे अ‍ॅटर्नी जनरल (Attorney General of India) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मुकुल रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते. सध्याचे अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. 

91 वर्षीय केके वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सूत्रांच्या हवाल्याने मुकुल रोहतगी यांच्याबाबतची ही माहिती समोर येत आहे. मुकुल रोहतगी यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. 2020 मध्ये केके वेणुगोपाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले वय लक्षात घेऊन अ‍ॅटर्नी जनरल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती. पण, सरकारने केके वेणुगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी आणखी दोन वर्षे या पदावर राहण्याचे मान्य केले होते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुकुल रोहतगी 1 ऑक्टोबरपासून अ‍ॅटर्नी जनरल म्हणून दुसरा कार्यकाळ सुरू करतील, अशी शक्यता आहे. मुकुल रोहतगी यांनी  भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे. 2017 मध्ये मुकुल रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासह संवेदनशील मुद्द्यांवर त्यांच्याशी सल्लामसलत केली होती.

मुकुल रोहतगी यांनी लढवले आहेत महत्त्वाचे खटले2014 मध्ये भाजप मोठ्या जनादेशाने सत्तेवर आल्यावर मुकुल रोहतगी यांची पहिल्या कार्यकाळासाठी अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुकुल रोहतगी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी गुजरात दंगलीसह अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. मुकुल रोहतगी हे गुजरात दंगलीप्रकरणी गुजरात सरकारचे वकील होते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित खटलाही त्यांनी लढवला. अलीकडेच मुकुल रोहतगी यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वकिलांचे नेतृत्व केले होते. आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय