शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Mulayam Singh Passed Away: समाजवादी नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 09:56 IST

२२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

गुरुग्राम - समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झाले आहे. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु वयाच्या ८२ व्या वर्षी मुलायम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ वर्षापासून मुलायम सिंह यादव यांची तब्येत खराब होती. महिन्यातून २-३ वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. परंतु ऑगस्ट महिन्यापासून मुलायम यांची तब्येत खालावत चालली होती. 

२२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायम सिंह यादव यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे. 

अलीकडेच पत्नीचं झालं होतं निधनमुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे ९ जुलै २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. १९८० मध्ये त्यांची पहिल्यांदा मुलायम सिंह यादव यांच्यासोबत भेट झाली होती. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. पण, त्या आपल्या पतीसोबत जास्त काळ राहिल्या नाहीत आणि चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे लग्न झाले. साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होत्या. 

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी