Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना २ ऑक्टोबर रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक होती आणि कोणतीही सुधारणा झाली नाही. 'सपा'चे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनी आपल्या कुटुंबासाठी मोठा राजकीय वारसा मागे सोडला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी सुमारे १६.५२ कोटी रुपयांची संपत्तीही मागे सोडली आहे.
देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुलायम सिंह यादव यांची एकूण संपत्ती १६,५२,४४,३०० रुपये होती. या स्थावर मालमत्तेचा खुलासा करतानाच मुलायम सिंह आणि त्यांची पत्नी साधना यादव यांचे वार्षिक उत्पन्न ३२.०२ लाख रुपये इतके असल्याचे जाहीर केले होते.
पूर्वी शहीदांची टोपी घरी यायची, मुलायम सिहांनी पार्थिव पोहोचविण्याचा निर्णय घेतला...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर करण्यात आलेल्या या प्रतिज्ञापत्रात नोंदवलेली माहिती पाहता मुलायमसिंह यादव यांच्याकडे स्वत:ची कोणतीही गाडी नव्हती. कोटय़वधींची संपत्ती असूनही त्यांच्यावर २,१३,८०,००० रुपयांचे कर्ज होते आणि हे कर्ज त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून घेतले होते. मात्र, त्यांनी हे कर्ज का घेतले? याचा खुलासा झाला नाही.
५ वर्षात मालमत्ता कमी झालीपीटीआयच्या माहितीनुसार समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत सुमारे ३ कोटी रुपयांची घट झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मुलायम सिंह यादव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती १९,७२,५९,८१७ रुपये इतकी होती. जी पाच वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये १६.५२ कोटी रुपयांवर आली. रिपोर्टनुसार, मुलायम सिंह हे शेती आणि लोकसभा खासदार म्हणून मिळणार वेतन हीच त्यांची कमाईची साधनं होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्या बँक खात्यात ५६ लाख रुपये जमा आहेत आणि तर सुमारे १६ लाख रुपये त्यांच्याकडे रोख होते.
मुलायम सिंह यांचं घर आणि गाड्यामुलायम सिंह यांच्याकडे टोयोटा कार आहे, ज्याची किंमत सुमारे १७ लाख रुपये आहे. त्याच्याकडे ५० हजारांहून अधिक किमतीचे एलिमिनेटर वाहन आहे. घराबद्दल बोलायचे झाले तर मुलायम सिंह यांचे लखनौमध्ये घर आहे, जिथं ते पत्नी साधनासोबत राहत होते. त्यांचा इटावामध्येही एक प्लॉट आहे. माजी मुख्यमंत्री इटावा येथील सैफई येथील आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची कृषी संपत्ती आहे. मुलायम यांच्याकडे ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन आहे. तसेच १० कोटींहून अधिक किमतीची बिगर शेतीची जमीन आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"