ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 21 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव या दोघांमध्ये झालेली गळाभेट आणि 'कान की बात'चा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. यावेळी मुलायम सिंह यादव पंतप्रधान मोदींच्या कानात नेमके काय पुटपुटले असावे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्याचा खुलासा आज समोर आला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला मुलायम सिंग पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली.
मुलायम सिंह यादव पंतप्रधानांच्या कानात काय पुटपुटले याचा खुलासा इंग्रजी वृत्तपत्र 'द टेलिग्राफ'ने केला आहे. टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार, मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधानांना मुलगा अखिलेश यादव यांची काळजी घ्यायले सांगितले. ‘थोडा अखिलेश का खयाल रखिये… और इनको सिखाईये…’ असे मुलायम मोदींच्या कानात बोलल्याची माहिती मिळत आहे.
भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेस आघाडीचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला व सरकारही स्थापन केलं. दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत केलेली युती मुलायम सिंह यादव यांना कधीही पटली नव्हती. यावर त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली. यावरुनच यादव यांनी मोदींना मुलगा अखिलेश यांची काळजी घ्यायला सांगून याद्वारे मुलाप्रती असलेले प्रेम व काळजीही व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
मोदी-मुलायम यांची गळाभेट; गुजगोष्टी
लखनऊच्या कांशीराम स्मृती उपवन मैदानावर रविवारी सकाळी उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा तासभर चाललेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची झालेली गळाभेट हे मोठे आकर्षण ठरले.
सर्व मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यावर पंतप्रधान मोदी उठून तेथून बाहेर निघणार तेवढ्यात मुलायम सिंह यांनी त्यांना थांबवले व मोदीही थांबले. दोघांनी परस्परांना आलिंगन दिले. एवढेच नव्हे तर मुलायम सिंह पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली. मुलायम-मोदी यांच्यातील गुजगोष्टीचा खुलासा 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रातून अखेर समोर आला आहे.