इस्लामाबाद - भारतात केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजसत्ताक दिनी दिल्लीत ज्या पद्धतीने ट्रॅक्टर रॅली काढली, त्याच पद्धतीने आता पाकिस्तानातही ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड आणि लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) सहकारी गोपाल सिंग चावलाने (Gopal Singh chawla) बुधवारी ही घोषणा केली. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपर्यंत ही ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, असे गोपाल सिंग चावलाने म्हटले आहे. (Hafiz Saeed aide announce tractor rally in Pakistan)
गोपाल चावला खालिस्तानी दहशतवादी -गोपाल चावला (Gopal chawla) हा खालिस्तानी दहशतवादी आहे. त्याने, भारत सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पाकिस्तानात भारतीय सीमेपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे म्हटले आहे. चावलाच्या या घोषणेमुळे स्पष्ट झाले आहे, की पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतात शेतकरी मुद्दा भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आयएसआयच सातत्याने चावलाला संरक्षण देत आली आहे.
ननकाना साहीबपासून वाघा बॉर्डपर्यंत रॅली -चावला भारतीय शेतकऱ्यांना आणखी डकावण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढत आहे. या समर्थनार्थ त्याने एक दोन मिनिटांचा व्हिडिओही जारी केला आहे. त्याने या ट्रॅक्टर रॅलीसाठी पाकिस्तानातील नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्याने म्हटले आहे, की ही ट्रॅक्टर रॅली ननकाना साहीबपासून सुरू होऊन भारतीय सीमेपर्यंत वाघा बॉर्डवर जाईल. यापूर्वीही अनेक वेळा चावलाने भारतीय नागरिकांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत काय घडले? -भारतात झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यातही घुसले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ले केले आणि सरकारी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यावेळी अनेक बस गाड्यांचीही तोडफोड केली गेली होती.
आंदोलक शेतकऱ्यांच्या या हिंसाचारात जवळपास 300 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी अनेक नेत्यांवर आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय हिंसाचारासाठी भडकावणाऱ्या दीप सिद्धूलाही अटक करण्यात आली आहे.