- संतोष ठाकूरनवी दिल्ली : मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे.या नवीन राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकत्र उपस्थित राहता येईल, अशा सोयीचा मुहूर्त काढला जाणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल व्यस्त आहेत, तर दुसरीकडे राज्यातील घडामोडींमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नवीन राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यासाठी आणखी काही वेळ मागितलाआहे. जेणेकरून दोघांना एकत्रित या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.या नवीन राजधानी एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्टÑ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी मार्ग थोडा वाढविण्यात आला आहे. तथापि, कमी वेळेत या एक्स्प्रेसचा प्रवास पूर्ण व्हावा, यादृष्टीने पावले उचलली जातील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही एक्स्प्रेस सुरूकरण्याची घोषणा केली जाऊ शकते. निश्चित करण्यात आलेल्या मार्गानुसार मुंबईतील सीएसटीहून कल्याण, नाशिक, जळगाव, खंडवा, भोपाळ, झांसी, आग्रामार्गे निजामुद्दीनपर्यंत ही रेल्वे धावेल. सध्या मुंबई-दिल्लीदरम्यान दोन राजधानी एक्स्प्रेस चालतात.मुंबई-दिल्लीसाठी ही नवीन राजधानी एक्स्प्रेस असेल. यामुळे महाराष्टÑासोबत मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशलाही फायदा होेईल, असे गोयल यांनी सांगितले.
मुंबईला मिळणार नवीन राजधानी एक्स्प्रेस, जानेवारीअखेर धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 4:58 AM