- संतोष ठाकूर नवी दिल्ली : देशात सी-प्लेनचा प्रारंभ मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांत होऊ शकतो. याचे कारण म्हणजे तेथे त्यासाठी पोषक वातावरण आणि संधी आहे. केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या चार वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देण्यासाठी आयोजित संमेलनानंतर ‘लोकमत’ शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, सरकार सी-प्लेनचे धोरण राबवत आहे. सिंगल किंवा एक इंजिन प्लेनसाठी तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास केला जात आहे.महाराष्ट्रात सी-प्लेनच्या शक्यतेवर सिन्हा म्हणाले की, येथे समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे लहान अंतरासाठी सी-प्लेन खूपच परवडणारे व उत्तम वाहतूक साधन बनू शकते. महाराष्ट्रात काही शहरांत सुरवातीच्या टप्प्यात ही सेवा सुरू होऊ शकेल. ही शहरे मुंबई, पुणे आणि अमरावती ही असू शकतात.
मुंबईत सगळ्यात आधी सी-प्लेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:09 AM