मनपा अर्थसंकल्प- भाग ५
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
चौकट....
चौकट....किमोथेरेपी सेंटर सुरू करणार आयुक्त हर्डीकर यांनी अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कॅन्सर रुग्णांसाठी किमोथेरेपी सेंटर सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. गांधीनगर येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये हे सेंटर सुरू केले जाईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गरीब रुग्णांना माफक दरात ही सेवा मिळेल. सुरेश भट सभागृहाच्या बांधकामासाठी आणखी दोन वर्षे कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या कामासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामावर आजवर १४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या सभागृहाच्या बांधकामाची कामे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण केली जातील. इतर कामे डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होतील. १ जानेवारी २०१७ रोजी हे सभागृह शहरातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची डेडलाईन आयुक्तांनी दिली आहे. अग्निशमन विभागाचे सक्षमीकरणअग्निशमन विभागाला सक्षम व आधुनिक करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. दोन आधुनिक रेस्क्यू टेंडर, तीन स्मॉल फायर टेंडर, सहा फायर सूट खरेदी केले जातील. ४२ मीटरपर्यंत पोहचणारे टर्न टेबल लॅढड़ (टीटीएल) शिवाय ३२ मीटरचे हायड्रोलिक प्लॅटफार्म खरेदी केले जातील. कोट....वास्तविक अर्थसंकल्प अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्न व खर्चाच्या प्रत्येक पैैलूवर विचार करण्यात आला. हा वास्तविक अर्थसंकल्प आहे. गतिमान प्रशासन, ई-गव्हर्नन्स तसेच गुणवत्तापूर्ण सेवेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करपद्धती सुलभ केली व नागरिकांना उत्तम सेवा दिल्या गेल्या तर उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते. - श्रावण हर्डीकर मनपा आयुक्त