नगराध्यक्ष निवडणूक; खर्च मर्यादा १० लाख
By admin | Published: October 23, 2016 1:17 AM
मुंबई : राज्यातील आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा अ वर्ग नगरपालिकांत १० लाख रुपये, ब वर्ग नगरपालिकांत ७ लाख ५० हजार रुपये तर क वर्ग नगरपालिकांमध्ये ५ लाख रुपये असेल. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी ही खर्चमर्यादा जाहीर केली. नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. नगरसेवकांच्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा अ ...
मुंबई : राज्यातील आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा अ वर्ग नगरपालिकांत १० लाख रुपये, ब वर्ग नगरपालिकांत ७ लाख ५० हजार रुपये तर क वर्ग नगरपालिकांमध्ये ५ लाख रुपये असेल. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी ही खर्चमर्यादा जाहीर केली. नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. नगरसेवकांच्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा अ वर्ग नगरपालिकेत ३ लाख रुपये, ब वर्ग नगरपालिकेत २ लाख ५० हजार रुपये तर क वर्ग नगरपालिका आणि नगर पंचायतीत प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये इतकी असेल. (विशेष प्रतिनिधी)