पैशांच्या तगाद्यामुळे खून प्रजापतनगरातील खून प्रकरण : पाचही आरोपींनी दारूच्या नशेत केला घात
By admin | Published: August 25, 2015 12:38 AM
जळगाव- तीन हजार रुपयांसाठी सतत लावलेला तगादा, शिवीगाळ यामुळे त्रासलेल्या जुबा उर्र्फ शाहरूख खाटिक याने इतरांच्या साथीने शकील शेख मूळ रा.उत्राण ता.एरंडोल (ह.मु. रेल्वे क्वार्टरनजीकची झोपडपी, शिवाजीनगर) याचा घात केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
जळगाव- तीन हजार रुपयांसाठी सतत लावलेला तगादा, शिवीगाळ यामुळे त्रासलेल्या जुबा उर्र्फ शाहरूख खाटिक याने इतरांच्या साथीने शकील शेख मूळ रा.उत्राण ता.एरंडोल (ह.मु. रेल्वे क्वार्टरनजीकची झोपडपी, शिवाजीनगर) याचा घात केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. शेखचा रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास प्रजापतनगरानजीक एका शेतात खून झाला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी पाच आरोपींना सोमवारी पहाटे गेंदालाल मील भागातील वेगवेगळ्या घरांमधून अटक केली आहे. त्यात प्रमुख आरोपी जुबा ऊर्फ शाहरूख खाटिक, युनुस ऊर्फ सद्दाम सलीम पटेल, करण प्रकाश पवार, मुश्ताक मुबारक शेख सर्व रा.गेंदालाल मील परिसर, हर्षल वना महाजन रा.पंचशीलनगर, भुसावळ या आरोपींचा समावेश आहे. अटकेसाठी निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात तीन पथक तयार केले होते. जुबाने घेतले होते चार हजार रुपये उसने, यापूर्वीही झाला होता वादआरोपी जुबाने मृत्यू झालेल्या शकीलकडून चार हजार रुपये उसने घेतले होते. पैकी एक हजार रुपये त्याने परत केले होते. तीन हजार रुपये मात्र जुबा देत नव्हता. ते मिळावेत यासाठी शकीलने जुबाकडे तगादा लावला होता. त्यासाठी शकील जुबाला शिवीगाळ करायचा. शिवीगाळ आणि अर्वाच्च भाषेवरून जुबा आणि शकील यांच्यात आठ दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात मोठा वाद झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला होता. दारूच्या नशेत सर्व विसरले मैत्री, आठ वाजता किरकोळ वाद, नंतर भोसकलेजुबा आणि शकील यांची मैत्री होती. यातूनच त्यांच्या पैशांची देवाणघेवाणही झाली होती. पण शकील हा अर्वाच्च भाषेत बोलायचा. त्यात तो मैत्रीही विसरला होता, असे जुबाने कबुली देताना पोलिसांना सांगितले आहे. यातच रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जुबा आणि शकील यांच्यात रेल्वे स्थानकावर किरकोळ वाद झाला होता. यात शकीलने जुबा व त्याच्या मित्रांना धमक्या दिल्या व शिवीगाळ केली होती. यानंतर जुबाने शकीलचा बदला घेण्याचे ठरविले. प्रजापतनगरात गाठलेशकील रोज कुठे जातो याची सर्व माहिती जुबाला असायची. अशातच रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शकील प्रजापतनगरातील कांचन नामक तृतीयपंथीकडे गेला होता. कांचनच्या घरातून बाहेर आल्यानंतर जुबा व त्याच्या चार साथीदारांनी शकीलला अडविले व लागलीच त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.