शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

'माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली'; मणिपूरवरून राहुल गांधी लोकसभेत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 12:48 PM

Parliament No-confidence Motion Debate: मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली: आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलत आहेत. भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. तसेच मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. 

मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. मी जेव्हा मणिपूरला गेलो होतो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांशी, पीडित लोकांसोबत संवाद साधला. त्यावेळी एक महिला म्हणाली की, माझ्या डोळ्यांसमोर मुलाची गोळ्या घालून हत्या केली. रात्रभर ती आई त्या मृतदेहासोबत राहिली, असं राहुल गांधी यांनी सांगितले. 

 

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भारताचा आवाज एकच आहे. द्वेष दूर करावा लागेल. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेलेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. आज मणिपूर हे मणिपूर राहिलेले नाही. तुम्ही मणिपूर तोडले आहे. तुम्ही भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारत मातेची हत्या करणारे आहात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या विधानावरुन सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रावण फक्त दोन लोकांचे ऐकत असे, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी हे अमित शाह आणि अदानी या दोनच लोकांचे ऐकतात. हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने लंका जाळली. रामाने रावणाला मारले नाही, त्याच्या अहंकाराने मारले. तुम्ही देशभर रॉकेल फेकत आहात. तुम्ही हरियाणा जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देश पेटवण्यात व्यस्त आहात, असा निशाणा राहुल गांधींनी भाजपावर साधला.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्याशिवाय रेवंत रेड्डी आणि हेबी एडन यांची नावे चर्चेसाठी देण्यात आली आहेत. त्याचवेळी विरोधकांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडणार आहेत. यानंतर गृहमंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, हिना गावित, रमेश बिधुरी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील. राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसच्या वतीने चर्चेला सुरुवात करणार होते,मात्र काँग्रेसने शेवटच्या क्षणी आपली रणनीती बदलून गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा