श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. मृत जवानाचे नाव इरफान अहमद मीर असे असून तो सेजान कीगमचा रहिवासी होता. त्याला गोळ्या घालून मारण्यात आले.अधिकाºयांनी सांगितले की, मीर हा प्रादेशिक सैन्यात होता. तो रजेवर गावी गेला असताना अतिरेक्यांनी त्याचे अपहरण करुन नंतर हत्या केली. अधिक माहिती घेतली जात आहे.जवानाचा मृतदेह शोपियाच्या वतमुल्लाह कीगमच्या बागेत दिसून आला. हा जवान अवघ्या २३ वर्षांचा असून, त्याचा लवकरच विवाह होणार होता. यापूर्वीही अतिरेक्यांनी याच प्रकारे जवानाची हत्या केली होती.हल्ल्यांमध्ये वाढमुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जवानाच्या क्रूर हत्येचा मी निषेध करते. अशा दुष्ट कृत्यांमुळे काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा संकल्प कमजोर होणार नाही. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही जवानाच्या हत्येचा निषेध केला आहे. काश्मिरात या वर्षात अतिरेक्यांकडून होणारे हल्ले व घुसखोरीत मोठी वाढ झाली आहे. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघनही होत आहे.
अतिरेक्यांकडून जवानाची हत्या, काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील घटना, रजेवर असताना केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:57 PM