शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

एअर इंडियाचा महाप्रताप, मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला बसवले मुंबईच्या विमानात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 2:45 PM

मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला मुंबईच्या विमानात बसवून एअर इंडियाने नवा गोंधळ घातला आहे. यामुळे कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएअर इंडियाचे 15 डिसेंबर रोजी दिल्ली-मुंबई एआय24 हे विमान हे उड्डाणासाठी रन-वेवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे विमानात उड्डाणपूर्व उद्घोषणा करण्यात आली.एअर इंडियाने आपल्याला चुकीच्या विमानात बसवल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले आणि त्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले

नवी दिल्ली- कदाचित चुकीच्या बसमध्ये चढण्याचा किंवा घाई-गडबडीत चुकीच्या लोकल किंवा रेल्वेत प्रवासी बसण्याने झालेल्या गोंधळाच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, तसा एखादा अनुभवही प्रत्येकाला असतो. मात्र एअर इंडियाने यासर्वांच्या पुढे जात मस्कतला जाणाऱ्या एका प्रवाशाला चक्क मुंबईला जाणाऱ्या विमानात बसवून भोंगळ कारभाराचे नवे उदाहरण प्रस्थापित केेले आहे. विमानात बसल्यावर हे विमान मुंबईला जाण्यासाठी उड्डाण करणार आहे अशी उदघोषणा झाल्यावर मात्र हा गोंधळ प्रवाशाच्या लक्षात आला आणि त्याने लगेचच ही बाब विमानाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.  त्यानंतर त्याला सोडण्यासाठी विमान पुन्हा टर्मिनलला नेण्यात आले. 15 डिसेंबरला घडलेल्या या घटनेची माहिती उघड झाली आहे.या गोंधळानंतर एअर इंडियाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्या प्रवाशाच्या सुदैवाने मस्कतला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण एक तास उशिरा होणार होते. त्यामुळे त्याला मुंबईच्या विमानातून उतरून त्या विमानात जाता आले. अन्यथा तो मस्कत प्रवासाला मुकला असता."एअर इंडियाचे 15 डिसेंबर रोजी दिल्ली-मुंबई एआय24 हे विमान हे उड्डाणासाठी रन-वेवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे विमानात उड्डाणपूर्व उद्घोषणा करण्यात आली. त्यावेळेस एअर इंडियाने आपल्याला चुकीच्या विमानात बसवल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले आणि त्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर त्याला एअर इंडियाच्या एआय 973 या मस्कतला जाणाऱ्या विमानात बसविण्यात आले," असे एअर इंडियाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. प्राथमिक तपासामध्ये डिपार्चर गेटजवळचे बोर्डिंग कार्ड स्कॅनर योग्यप्रकारे काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बोर्डिंग पासची तपासणी कर्मचाऱ्यांकडू केली जात होती. व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पासवर बारकोड होते आणि त्याच दिवशी स्कॅनर बंद होता. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने असा प्रकार घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचेही सांगितले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत